हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1जूलै हा दिवस कृषी दिन उत्साहात साजरा

 

हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त

1जूलै हा दिवस कृषी दिन उत्साहात साजरा

 

सोयाबीन पीक कमीत कमी कीड लागणारं,अधिक उत्पादन देणारं,

आपल्या जमिनीला पूरक असं बियाणं शेतकऱ्यानी निवडावं,

बियाणांची उगवण क्षमता तपासणी करणं आवश्यक

---प्रगतशील शेतकरी कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रशांत पाटील यांचे प्रतिपादन

 

लातूर,दि.1 (जिमाका):- सोयाबीन हे पीक कमीत कमी कीड लागणारं, अधिक उत्पादन देणारं, आपल्या जमिनीला पूरक असं बियाणं शेतकऱ्यांनी निवडावं आणि बियाणांची उगवण क्षमता तपासणी करणं आवश्यक आहे, असे सांगली जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी कृषी भूषण पुरस्कार विजेते प्रशांत पाटील यांनी प्रतिपादन केले. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हरित क्रांतीचे प्रणेते यांच्या जयंतीनिमित्त 1 जूलै हा दिवस कृषी दिन म्हणून राज्यात साजरा केला जातो.  जिल्ह्यात दि. 25 जून, 2022  ते दि. 1 जुलै, 2022  या कालावधीत "कृषी संजीवनी" मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यानिमित्ताने कृषी विभागाच्यावतीने "कृषी संजीवनी" मोहीम सांगता  कार्यक्रमाचे येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दाताळ, विभागीय कृषी सहसंचालक कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव दिवेकर, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे संचालक  सचिन दिग्रसकर, अरुण गुट्टे, संदीप देशमुख, रत्नकार जवळगेकर,  जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी व संबंधित भागातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्यावतीने योजनांची पुस्तिका, सोयाबीन पिकाची अष्टसूत्री या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील आपल्या मार्गदर्शन करतांना म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचे उत्पादन दर हेक्टरी साडे सहा क्विंटलपर्यंत उत्पादन आहे. सोयाबीनची तपासणी करण्यासाठी एका सुती कपड्यामध्ये चार दिवसापर्यंत मोड येण्यासाठी ठेवावं म्हणजे बियाणं तपासणी लॅब स्वतःच्याच घरात आहे. बीजप्रक्रियेवर संस्करण करणं आवश्यक थायोमिथॉरद्वारे जैविक प्रक्रिया करणं महत्वाच... आपल्या शेतात एका फुटात चार रोपं लावावेत. बीयाणांचे टोकन केल्यानंतर 24 तासाच्या आत तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. खोड माशीचा प्रभाव वाढत असेल, तर कीटकनाशक वापरणं आवश्यक आहे. पिक लागवड केल्यानंतर रोगकिड येण्याअगोदर काळजी घ्यावी. सोयाबीन पीक घेत असताना ड्रीपचाही वापर करणं आवश्यक आहे. ठिबक सिंचनाशिवाय दुसरा पर्याय नाही,

पुढे श्री. पाटील म्हणाले की, अमेरिका, रशिया, चीन हे महासत्ता असणारे देश आहेत. अमेरिकामध्ये सोयाबीन दर हेक्टरी 40 क्विंटलपर्यंत तर अधिक 55 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. कोविड-19 च्या कालावधीत म्हणजे गेल्या तीन वर्षात जगातील महासत्ता असणारं देश सोयाबीन खरेदीच्या वाढीसाठी प्रयत्न करीत होते, तशी  सोयाबीची मागणीही वाढत आहे. त्यामुळे राहुरी विद्यपीठही किडरहित बियाणं संशोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे. सोयाबीनामध्ये अधिक प्रथिने (प्रोटीन) असल्याने जगात व इतर ठिकणी या सोयाबीनला प्रचंड मागणी आहे.  त्याबरोबरच पशुच्या खाद्यामध्येही याचा वापर केला जातो.

शेतीमध्ये अतिरिक्त खते उत्पादनासाठी आपण विविध खतांचा वापर करीत असतो. परंतु, शेतकऱ्यांनी असं न करता आपल्या शेतीतील माती परिक्षण  करुन घेणे आवश्यक आहे. त्यातून आपल्या शेतीमध्ये कोणत्या शेंद्रीय द्रव्याचा वापर करावा तसेच कोणते पीक घ्यावे. त्यानुसार आपल्याला नियोजन करणे शक्य होईल. तसेच सोयाबीन हे डाळ आणि तेलवर्गीय पीक आहे. तेलाचं उत्पादन वाढवणारं पीक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करणे, जमिनीतील शेंद्रियतेचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, असेही प्रशांत पाटील म्हणाले. 

सांगली जिल्ह्यातील पलूस येथील प्रगतशील शेतकरी कृषी भूषण पुरस्कार विजेते प्रशांत पाटील तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करतात. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलकोपचे प्रशांत पाटील हे होते. त्यांनी सोयाबीन पिकाचे टोकन पद्धतीने एकरी 28 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.   

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 50 ते 60 टक्के लोक शेती आणि शेतीशी संबंधित जोड व्यवसाय यावर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये नव-नवीन तंत्रज्ञान विकसित झाली आहे. टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केल्यास, यामध्ये उगवण्यासाठीची क्षमता जास्त आहे. जिल्हा परिषदेमार्फतही शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे यंत्र देण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. तसेच कृषी विभागाने अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर, बँकेच्या अधिकाऱ्यांना निमंत्रिक करावे, जेणे करुन कर्ज, नुकसान भरपाई याबाबत शेतकऱ्यांना अधिक माहिती मिळण्यास व मदत होणार आहे.

तसेच कृषी विभागाच्यावतीने पोकरा ही योजना शेतकऱ्यांसाठी समुद्रच आहे. पोकराअंतर्गत व नरेगा अंतर्गत योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहे. जास्तीत - जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा त्यासोबतच शेतकऱ्यांना फळबाग लागवड, रेशीम उद्योग क्षेत्रातही उतरुन आपली उन्नती साधावी यासाठी शेतकऱ्यानी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आपल्या प्रास्ताविकपर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पाऊस कमी- जास्त प्रमाणात आहे. अजूनही चांगला पाऊस झाला नाही, अहमदपूर जळकोट उदगीर येथे पाऊस चांगला आहे. परंतु इतर ठिकाणी पाऊस म्हणावा तसा पडलेला नाही. सोयाबीन पिकांची उत्पादकता कशी वाढवता येईल याचा कृषी विभागाच्या प्रयत्न आहे. त्यासंदर्भात जिल्ह्यात गावा-गावात जनजागृती करण्यात आली आहे. या जनजागृतीचा परिणाम भविष्यात दिसून येणार आहे. टोकन पद्धतीने कांही शेतकऱ्यांनी  यांनी पीक लागवड केली आहे. महाडेबिटच्या माध्यमातून मदत केली आहे. 1 हजार 200 हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. तंत्रज्ञान वापरून आपल्या उत्पन्नात वाढ करण्यात येणार आहे.






Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा