पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३० जुलै रोजी कवळखेड येथे आयोजन
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३० जुलै रोजी कवळखेड येथे आयोजन
लातूर, दि. २९ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर आणि उदगीर तालुक्यातील कवळखेद येथील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा ३० जुलै, २०२६ रोजी सकाळी १० वाजता जी.एस.पी.एम. कॅम्पस, बोधन नगर, जळकोट रोड, कवळखेड, ता. उदगीर, जि. लातूर येथे होणार आहे.
या मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून, त्यामध्ये बारावी, बी.फार्म, डी.फार्म, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.सी.ए., आय.टी.आय., डिप्लोमा, बी.ई. तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम (बायोडाटा) आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह मुलाखतीसाठी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे.
लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे. या मेळाव्याबाबत काही अडचण असल्यास उमेदवारांनी कार्यालयातील दत्तात्रय कांबळे (मो. ९०२८२३८४६५), लहू भंडारे (मो. ८०५५९९२९००) किंवा प्रविण वाघमारे (मो. ९९२२९२५८९५) यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन केले आहे.
****
Comments
Post a Comment