लातूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ३० : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अर्जदारांसाठी अर्जाचा नमुना संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध असून या क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असणाऱ्या प्रमाणपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. या व्यवस्थापकीय समितीवर शासनामार्फत विविध अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील गोशाळा किंवा पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचे अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशन केलेल्या दोन व्यक्ती, तसेच जिल्ह्यात मानवहितकारक व प्राणी कल्याणासाठी कार्यरत असणारे पाच ते सहा कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्राणी कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या पात्र संस्था, कार्यकर्ते आणि इच्छुकांनी ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास