मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लातूरमध्ये मतदार आणि बीएलओ मदत कक्षाची स्थापना
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम
लातूरमध्ये मतदार आणि बीएलओ मदत कक्षाची स्थापना
लातूर, दि. १७ : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घोषित केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) – २०२६ कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या अचूकतेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन विविध नमुने भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने २३४-लातूर ग्रामीण आणि २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार व कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय सहाय्यासाठी लातूर तहसील कार्यालय येथे मतदार मदत कक्ष व बीएलओ मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून ३० जुलै २०२६ पर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार असून नायब तहसीलदार (संगायो) परमेश्वर कांबळे (मो. ९४२१४००२५१) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या मतदार मदत कक्षामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी ओंकार बोबले (मो. ९१४६७१५१२३) व अर्जुन कांबळे (मो. ८३९०३५७४८०) तसेच तहसील कार्यालयातील कोतवाल पांढरे वाल्मिक (मो. ९६२३९२४०७८) व तानाजी अडसुळ (मो. ९५८८४५०५७४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, घरोघरी भेटी देणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना साहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बीएलओ मदत कक्षामध्ये विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे कृषी अधिकारी अनंत निकम (मो. ९४२१३७४२७३), महानगरपालिकेचे वैभव काचबावर (मो. ७०२०१४६८६६) आणि तहसील कार्यालयातील कोतवाल आकाश राजपुत (मो. ७३९७८५६९०६) व शिवलिंग थडकर (मो. ९४०३९११४००) हे कामकाज पाहणार आहेत.
*****
Comments
Post a Comment