दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. १७ (जिमाका) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिले जाणारे 'दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६' जाहीर करण्यात आले असून या राष्ट्रीय पुरस्कारांतर्गत प्रामुख्याने 'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन', 'श्रेष्ठ दिव्यांगजन' आणि 'श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बाल/बालिका' या तीन श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने लातूर जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करताना संबंधित दिव्यांग व्यक्तीने किंवा संस्थेने केलेल्या उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती पुराव्यांसह नमूद करणे आवश्यक आहे. त्यासोबत यु.डी.आय.डी. कार्ड किंवा अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केवळ ऑनलाईन माध्यमातून केलेले अर्जच विचारात घेतले जाणार असून हस्तलिखित, टपाल अथवा इतर कोणत्याही भौतिक स्वरूपात प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र घटकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास