छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात मत्स्यव्यवसाय योजनांची जनजागृती; एनएफडीपी प्रमाणपत्रांचे वाटप

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात मत्स्यव्यवसाय योजनांची जनजागृती; एनएफडीपी प्रमाणपत्रांचे वाटप लातूर, दि. २९ (जिमाका): राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मंगळवारी लातूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये या योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिकांना राष्ट्रीय मत्स्यव्यावसायिक डिजिटल प्लॅटफॉर्म (एनएफडीपी) अंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना एनएफडीपी प्रमाणपत्रांचे अधिकृत वितरण करण्यात आले, ज्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, केसीसी (केसीसी) सुविधा, विमा संरक्षण तसेच डिजिटल ओळख प्राप्त होण्यास मदत होणार आहे. तसेच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा मिशन (सीएमएमएसआय) अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘ऑल-इन-वन’ योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. याद्वारे मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यसंवर्धन, मत्स्यपालन, मत्स्यविक्री, मूल्यवर्धन व पायाभूत सुविधा निर्मितीसह मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध घटकांना एकाच छताखाली अनुदान उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री अपघात गट विमा योजना, ई-श्रम कार्ड, एनएफडीपी नोंदणी आणि केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे स्वरूप, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, बँक कर्ज सुविधा व अनुदानाबाबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मत्स्यव्यावसायिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी डिजिटल नोंदणी, बँक खाते संलग्नता, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास