शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुका व महानगरपालिकास्तरीय स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन

शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुका व महानगरपालिकास्तरीय स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन लातूर, दि. २७ (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व लातूर महानगरपालिका लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२०२७ या वर्षातील शालेय तालुकास्तर, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर क्रीडा स्पर्धांच्या आयोजन नियोजनासाठी स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार अहमदपूर तालुक्याची बैठक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय येथे, चाकूर तालुक्याची बैठक ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता चापोली येथील संजीवनी विद्यालय येथे, जळकोट तालुक्याची बैठक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जळकोट येथील महात्मा फुले महाविद्यालय येथे, तर देवणी व उदगीर या दोन्ही तालुक्यांसाठी ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता उदगिरी महाविद्यालय येथे बैठक पार पडणार आहे. तसेच निलंगा व शिरूर अनंतपाळ या दोन्ही तालुक्यांसाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथे, औसा तालुक्यासाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आलमला येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी येथे, लातूर व रेणापूर या दोन्ही तालुक्यांसाठी ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता लातूर येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आणि लातूर शहर महानगरपालिकास्तरासाठी ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालय एम.आय.डी.सी. येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन सुरळीत व वेळेत व्हावे याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा शिक्षकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंढे यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत