जलसंधारणातून समृद्धी--शंकरराव गडाख मंत्री, मृद् व जलसंधारण
जलसंधारणातून समृद्धी गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, जलसंधारण योजनांचे पुनरुज्जीवन, जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती इत्यादी कामांना प्राधान्य दिले जात आहे. राज्यातील जलसंचय वाढीबरोबरच जमिनीची धूप थांबवण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येत आहे. *शंकरराव गडाख* *मंत्री, मृद् व जलसंधारण* मृद् व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शेतकर्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच भूजल पातळी वाढावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध प्रकल्पांची दुरुस्ती करून मूळ पाणी साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपर्यंत विभागामार्फत 306 कोटी रुपयांच्या 1 हजार 405 योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. *लोकसहभागातून जलसंधारण* उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन म्हणजे जलसंधारण होय. उपलब्ध पाण्याचे प्रमाण स्थिर असल्या...