उन्हाळी हंगामासाठी महाबीजचे भुईमुग टीएजी-24 वाण अनुदानावर उपलब्ध्‍

 

उन्हाळी हंगामासाठी महाबीजचे

भुईमुग टीएजी-24 वाण अनुदानावर उपलब्ध्‍

 

लातूर दि.11 ( जिमाका ) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भुईमुग टीएजी-24 वाणाचे ग्राम-बिजोत्पादन योजनेमध्ये अनुदानित दराने बियाणे घेण्यासाठी कृषी विभागाकडून परमीट घेवून महाबीज विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, लातूर व जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

उन्हाळी 2021-22 हंगामाकरिता राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानाअंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप- अभियानमध्ये भुईमुग टीएजी-24 वाणाचे एक एकर क्षेत्रासाठीचे बियाणे ग्राम बिजोत्पादन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनुदानित दराने उपलब्ध्‍ आहे. या बियाण्याची 20 किलोबॅगची मूळ किंमत 3 हजार 300 रु. असून त्यासाठी प्रति बॅग 1 हजार 400 रु. अनुदान असून अनुदान वजा किंमत शेतकऱ्यांसाठी 1 हजार 900 रु. प्रति बॅग या अनुदानित दराने उपलब्ध्‍ केलेले आहे.

या योजनेअंतर्गत बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधीत कृषी सहायक यांच्याशी संपर्क करुन सातबारा व आधार कार्ड देवून परमिट प्राप्त करुन घ्यावे. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक एकर क्षेत्रासाठी 20 किलोच्या दोन बॅग अनुदानित दराने बियाणे उपलब्ध्‍ होईल.

सदरील अनुदानित बियाणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धरतीवर देण्यात येईल. परमीट घेतल्यापासून शेतकऱ्यांनी तीन दिवसाचे आत महाबीजच्या विक्रेत्याकडून बियाणे उचल करने आवश्यक आहे त्यानंतर सदरील परमीट वैध राहणार नाही.

 

                                                            ***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु