उन्हाळी 2021-22 हंगामासाठी भुईमुग (TAG-24) बियाणे ग्रामबिजोत्पादन राबविण्यासाठी अनुदानावर उपलब्ध -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

उन्हाळी 2021-22 हंगामासाठी भुईमुग (TAG-24) बियाणे

ग्रामबिजोत्पादन राबविण्यासाठी अनुदानावर उपलब्ध

                                    -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

     लातूर दि.13 (जिमाका):- राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियान (SMSP) मध्ये उन्हाळी हंगामात भुईमूग या पिकाचे ग्रामबिजोत्पादन राबविण्यासाठी शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रासाठी भुईमूग TAG-24 या वाणाचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध करुन देण्यात येत आहेत , असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

           या  भुईमूग बियाण्याची बॅग 20 किलोची आहे त्यांची  मुळ किंमत रु. 3 हजार 300 असून त्यासाठी प्रति बॅग रु. 1 हजार 400 अनुदान आहे. अनुदान वजा जाता किंमत शेतक-यांसाठी रु.1 हजार 900 प्रति बॅग या दराने उपलब्ध आहे.

या योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अनुक्रमे    51 टक्के, 31 टक्के 17 टक्के या प्रमाणे शेतकऱ्यांची निवड करुन परमिट, सातबारा (7/12) व आधार क्रमांक लिहून परमिट कृषि सहाय्यकामार्फ़त वाटप करण्यात येणार आहे.

       एका शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रासाठी 20 किलोच्या दोन बॅग अनुदानित दराने बियाणे उपलब्ध होतील. परमिट घेतल्यापासून शेतकऱ्यांनी तीन दिवासाच्या आत महाबीजच्या विक्रेत्याकडून बियाणे उचल करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदरील परमिट वैध राहणार नाहीत.

          अधिक महितीसाठी आपल्या गावच्या कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने  यांनी केले आहे.

0000                                  

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु