राज्यसेवा पूर्व परिक्षा-2021 परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

राज्यसेवा पूर्व परिक्षा-2021

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

लातूर,दि.20(जिमाका)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा 2021 लातूर शहरातील 19 उपकेंद्रावर दि. 23 जानेवारी 2022 रोजी होत आहे.परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 चे कलम 144 अन्वये परीक्षा केंद्राच्या  शंभर मीटरच्या परिसरात पूढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

परीक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करते वेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. शंभर मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसरमाध्यमे घेऊन करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेश मनाई राहील.

रविवार, दिनांक 23 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा - 2021 ही लातूर शहरातील विविध 19 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राचा तपशील पूढील प्रमाणे आहे.

यामध्ये देशीकेंद्र विद्यालय सिग्नल कँम्प लातूर, यशवंत विद्यालय, नांदेड रोड लातूर, जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड लातूर, परिमल विद्यालय नारायणनगर, लातूर, सरस्वती विद्यालय खाडगांव रोड प्रकाश नगर लातूर, गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय दयाराम रोड लातूर, ज्ञानेश्वर विद्यालय शाहू चौक नांदेड रोड लातूर, श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, खाडगांव रोड लातूर, राजर्षी शाहू वाणिज्य महाविद्यालय बस स्टँडसमोर लातूर, श्री.श्री. रविशंकर विद्यामंदीर खाडगांव रोड लातूर, दयानंद विज्ञान महाविद्यालय बार्शी रोड लातूर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल दिलीप माने नगर खाडगांव रिंगरोड लातूर, श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय सिग्नल कँम्प लातूर, श्री. व्यंकटेश विद्यालय झिंगणाप्पा गल्ली लातूर, दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी रोड लातूर, दयानंद कला महाविद्यालय बस स्टँड बार्शी रोड लातूर, राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय बस स्टँड समोर लातूर,राजर्षि शाहू कला महाविद्यालय बस स्टँड समोर लातूर व केशवराज विद्यालय श्याम नगर लातूर या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

हा आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे बाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत.

 

 

0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु