नारी शक्ती पुरस्कारसाठी ऑनलाईन नामनिर्देशन सादर करावेत

 

नारी शक्ती पुरस्कारसाठी ऑनलाईन

 नामनिर्देशन सादर करावेत

 

लातूर दि.17 (जिमाका):-जिल्ह्यातील महिला कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व स्वंयसेवी संस्थाकडून ऑनलाईन पध्दतीने नामांकने www.awards.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. नामनिर्देशन सादर करण्याची पध्दत, सादर करताना कोणती कागपत्रे जोडावयाची आहेत. आवश्यक पात्रता, वयाची अट, अनुभव इत्यादी माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध्‍ आहे. इच्छुक व्यक्ती व संस्थाकडून ऑनलाईन पध्दतीने दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत नामनिर्देशन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 2016 पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राणी रुद्रम्मा देवी, माता जिजाबाई, कन्नगी देवी, राणी गैडिनलिउ झेलियांग, देवी अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई व महिला कल्याण क्षेत्रात असामन्य व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व उत्कृष्ट संस्थांना 20 नारी शक्ती पुरस्कार प्रदान केले जातात.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला लातूर किंवा या कार्यालयाच्या 02382-248728 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

 

                                                0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु