कृषी विभागामार्फत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजूरी पंधरवाडा

 

कृषी विभागामार्फत सूक्ष्म अन्न प्रक्रिया

उद्योगांना बँक कर्ज मंजूरी पंधरवाडा

 

         लातूर दि.4 (जिमाका):- इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे  सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळवण्यास गती देण्यासाठी  कृषी विभागामार्फत दिनांक ३ जानेवारी ते १८ जानेवारी 2022 या कालावधीत अन्नप्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजूरी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने इच्छुक व्यक्तीं व गटांनी (स्वयं सहाय्यत गट,शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी  प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी https://pmfme.mofpi.gov.in या MIS पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी  पत्रकाव्दारे केले आहे.

    आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) जिल्हयात सन २०२०-२१ पासून राबविण्यात येत आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या आधारावर राबविलीजात आहे.या योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणूकी करिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35टक्के कमाल 10.00  लाख अनुदान देय आहे.  तसेच गट लाभार्थी जसे स्वयं:सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्था यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूक या करिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के  अनुदान देय आहे. या शिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयं सहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग आणि प्रशिक्षण या घटकांकरिताही लाभदेय आहे.

   सन 2021-22  या योजने अंतर्गत भांडवली गुंतवणूकी करिता 5003 वैयक्तिक उद्योगांना अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच २६४ स्वयं सहाय्यतागट,७२ शेतकरी उत्पादक कंपन्या व २० सहकारी संस्थांनाही अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.

दिनांक ३० डिसेंबर २०२१ पर्यंत ६ हजार १८८ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी १ हजार ६०० सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले असून १ हजार २५० आराखडे बॅंक कर्जमंजूरीसाठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले आहेत. बँकाकडून कर्ज मंजुरीस सुरवात झाली असून आतापर्यंत १२०  प्रकल्पांना कर्ज मंजुरी मिळाली आहे.

   सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसीठी तालुका कृषि अधिकारी/ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

                                       0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु