नाविण्यपूर्ण योजनेच्या महिला बचत गटाची निवड 25 जानेवारी रोजी होणार

 

नाविण्यपूर्ण योजनेच्या महिला बचत गटाची निवड

25 जानेवारी रोजी होणार

 

           लातूर, दि.21 (जिमाका):- सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्फत कॅलिफोर्निया केज’च्या माध्यमातून अंडी उत्पादनास चालना देणे या नाविण्यपुर्ण योजनेतून जिल्ह्यातील महिला बचत गटाची निवड सोडत पध्दतीने निवड समितीकडून दि. 25 जानेवारी 2022 रोजी सकाळी  11.00 वाजता जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचे कक्षात होणार आहे.

         ‘कॅलिफोर्निया केज’च्या माध्यमातून अंडी उत्पादनास चालना देणे या नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत्‍ प्रति महिला बचत गट 50 कुक्कुट पक्षी, पशुसंवर्धन विभाग जिल्हा परीषद लातूर कडून 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परीषद, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                              ****

             

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा