शरद यशवंत दिव्यांग अस्मिता अभियानतंर्गत ऑनलाईन अपंग प्रमाणपत्रासाठी उपस्थित रहावे

 

शरद यशवंत दिव्यांग अस्मिता अभियानतंर्गत

ऑनलाईन अपंग प्रमाणपत्रासाठी उपस्थित रहावे

 

लातूर दि.13 (जिमाका) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे शरद यशवंत दिव्यांग अस्मिता अभियान अंतर्गत ज्या दिव्यांग व्यक्तीने वैश्विक ओळखपत्र (UDID) मिळण्याकरीता ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. ज्यांना अद्यापर्यंत ओळखपत्र / दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा दिव्यांग व्यक्तीने दि. 17  ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे आपले ऑनलाईन आवेदनपत्र, आधार कार्ड, अद्यावत पासपोर्ट साईज फोटो, दिव्यांग व्यक्तीचे जूने (SRDM) चे ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र घेवून नमूद दिनांकास सकाळी 9.00 ते  दुपारी 4.00 या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे. ओळखपत्र / दिव्यांग प्रमाणपत्राकरीता पूढीलप्रमाणे स्थळ ओ.पी. डी. नं. 8 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे तारखानिहाय त्या - त्या तालुक्यांनी उपस्थित रहावे.  

  सोमवार दि. 17 जानेवारी 2022 रोजी रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ तालुक्यात तर, जळकोट, मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी  रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ  जळकोट,  तालूक्यात तर, बुधवार दि. 19 जानेवारी 2022 रोजी औसा, देवणी, लातूर, अहमदपूर, निलंगा तालूक्यात तर गुरुवार दि. 20 जानेवारी 2022 रोजी औसा, देवणी, लातूर, अहमदपूर, निलंगा या तालुक्यात राहणार आहे.                                               

 

                                                       0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु