जिल्ह्यातील चार नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक हद्दीतील मद्य विक्री बंद आदेश जारी

 

जिल्ह्यातील चार नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक

हद्दीतील मद्य विक्री बंद आदेश जारी

 

लातूर दि.12 ( जिमाका ) जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ, चाकूर, देवणी व जळकोट तालुक्यातील अशा एकूण 04 नगरपांचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक दि. 18 जानेवारी 2022 रोजी होणार असून दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येत आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशान्वये तसेच महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा 1949 व त्याअंतर्गत विविध नियमातील तरतुदींनुसार प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी शिरुर अनंतपाळ, चाकूर, देवणी व जळकोट नगरपंचायत हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांचे मद्य विक्रीचे व्यवहार पूढील प्रमाणे पूर्णत:बंद ठेवण्याबाबत आदेश जारी केले आहेत.

दिनांक 16 जानेवारी 2022 मतदान संपण्यापूर्वी 48 तास आधी म्हणजे सायं. 6.00 वाजेपासून, दिनांक 17 जानेवारी 2022 मतदानाच्या पूर्वीचा दिवस- संपूर्ण दिवस, दिनांक 18 जानेवारी 2022 मतदानाचा दिवस- संपूर्ण दिवस व दिनांक 19 जानेवारी 2022 मतमोजणीचा दिवस- मतमोजणी संपूर्ण निकाल जाहीर हाईपर्यंत.

या आदेशाची शिरुर अनंतपाळ, चाकूर, देवणी व जळकोट नगरपांचायत हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासा कुचराई करतील त्यांच्याविरुध्द मुंबई, दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1) (सी) नुसार तसेच अनुषंगिक नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

                                                     ***

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा