नाफेड मार्फत फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात तुर खरेदीस सुरुवात -पालकमंत्री अमित देशमुख

 

नाफेड मार्फत फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात

तुर खरेदीस सुरुवात

                             -पालकमंत्री अमित देशमुख

लातूर,दि.5,(जिमाका):- जिल्ह्यात नाफेड मार्फत मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हमीभाव तुर खरेदीसाठी 18 तुर खरेदी केंद्र 1 जानेवारी 2022 पासून सुरु करण्यात आले असून शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

शासनाच्या आधारभूत किंमतीचा लाभ जिल्ह्यात उत्पादीत होणाऱ्या तुर उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी लातूर जिलहा मार्केटिंग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हयात 18 हमीभाव खरेदी केंद्रावर दिनांक 20 डिसेंबर 2021 पासून नोंदणी सुरु करण्यात आली असून तुर हमी भाव खरेदी केंद्रावर तुरीची ऑनलाईन नोंदणी करुन विक्रीस आनणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 6 हजार 300 रुपये दर मिळणार आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्र पूढील प्रमाणे आहेत. आधार कार्ड, 7/12, तुर पिक पेरा, आधारकार्डशी संलग्न असणारे बँक खात्याचे पासबुकची छायाकिंत प्रत, कार्यरत असलेला मोबाईल नंबर. तरी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करुन शासनाच्या हमीभाव खरेदीचा लाभ घ्यावा असे, आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

                                                        000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा