उमंग सेंटरच्या कार्याचा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गौरव

 

उमंग सेंटरच्या कार्याचा

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गौरव

 

लातूर,दि.28 (जिमाका)- प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे शासकीय ध्वजारोहणानंतर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते दिव्यांग क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर, लातूर यांचा गौरव करून प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, खासदार सुधाकर सिंगारे, आमदार धीरज विलासराव देशमुख, आयुक्त अमन मित्तल,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर सह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 या सेंटर चे वैशिष्ट्य म्हणजे येथील दिव्यांगासाठी न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट, अर्लीइंटर्वेंशन, ऑक्युपेसनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियर थेरपी, सायकॉलॉजिकल थेरेपी, फिजियोथेरेपी, स्पेशल एज्युकेशन व विशेष सेन्सरी पार्क या सर्व ट्रीटमेंट व थेरपी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत या थेरपी व ट्रीटमेंटचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे व बरे होऊन सामान्य जीवन जगत आहेत. या सेंटरमुळे पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम सेंटरच्या पूर्ण टीमणी केलेले आहे. हे सेंटर भारतातील एकमेव असे सेंटर आहे जे की सर्व ट्रीटमेंट एकाच छताखाली मिळते.



                                                        0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु