महा-डीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
महा-डीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी
लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे
आयोजन
लातूर,दि.25
(जिमाका):- महा-डीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकऱ्यांचा दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता फक्त निलंगा तालूक्यातील निवड झालेल्या लाभार्थीनी तालूका कृषि अधिकारी कार्यालय,
निलंगा येथे व इतर तालूक्यातील लाभार्थींनी दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी संबंधीत तालूका कृषि अधिकारी कार्यालय स्तरावर लाभार्थी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी हजर राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
लातूर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना,
राष्ट्रीय कृषि विकास येाजने अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कडधान्य,
ऊस विकास, पौष्टीक तृणधान्य, तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास येाजने अंतर्गत फुलपिक लागवड,
मशरुम उत्पादन, हरीतगृह,
शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, टॅक्टर, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण,
कांदाचाळ, पॅक हाऊस,
प्राथमिक प्रक्रिया केंद्र,
भाजीपाला रोपवाटीका (नर्सरी),
पाईप, पंप संच,
पेरणीयंत्र, रोटावेटर, मळणीयंत्र,
पॉवर टिलर व इतर ट्रॅक्टर चलीत औजारे इत्यादी घटकासाठी निवड झालेली आहे.
0000
Comments
Post a Comment