प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री

 अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

लातूर,दि.25(जिमाका):-भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, 26 जानेवारी 2022 रोजी बार्शी रोड, लातूर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 9.15 वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन  कार्यक्रम होणार आहे.

कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याकारणाने सर्व निमंत्रितांनी सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच मास्क परिधान करुनच या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

तसेच सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 15 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे.  या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे. यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वज संहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा