जिल्ह्यातील कलावंतामार्फत योजनेची माहिती पोहचवा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

जिल्ह्यातील कलावंतामार्फत योजनेची माहिती पोहचवा

                                         -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

          लातूर,दि.25 (जिमाका):- जिल्ह्यातील कोरोना कालावधीत जे कलाकार सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न या बाबीपासून वंचित राहीले आहेत. त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अनुदान देण्याच्या  योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक गावा-गावात योजनेचा प्रचार व प्रसार करुन जास्ती जास्त कलावंत, सर्व पात्र कलाकार यांच्यापर्यंत तलाठी, ग्रामसेवक यांनी योजनेची माहिती पोहचविण्याचे प्रयत्न करावेत तसेच उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावे लवकरात लवकर उपलब्ध्‍ करुन दयावेत अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी ऑनलाईन बैठकीत सुचना दिल्या.

 यावेळी  जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या. सदर अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करण्यास सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून यावेळी सर्व कलावंताना विहीत नमुन्यात अर्जासोबत राज्यातील रहीवासी पुरावा, कलाक्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असलेले पुरावे, आधार कार्ड व बँक खात्याचा पतशील, तहसीलदाराचे उत्पन्नाचा दाखला (48000/-) च्या कमाल मर्यादेत, शिधापत्रीकेची सत्यप्रत ही कागदपत्रे सोबत जोडावीत. केंद्र व राज्य शासनाच्या वृध्द कलावंत मानधन योजनेतून मानधन घेणारा लाभार्थी कलाकार तसेच इतर वैयक्तीक शासकीय अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. अशी सखोल माहिती देण्यात आली.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी यांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हास्तरीय वृध्द कलावंत निवड समितीचे अध्यक्ष लालासाहेब देशमुख व सन्मानिय सदस्य यावेळी बैठकीत उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु