उन्हाळी हंगामाकरिता तिळाचे दर्जेदार
बियाणे
महाबीजकडे
लातूर,दि.5,(जिमाका):- खास उन्हाळी
हंगामामध्ये पेरणी करिता योग्य असणारे तिळाचे PKVNT-11 वाणाचे महाबीज उत्पादित दर्जेदार बियाणे लातूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध् झालेले
आहेत. असे जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
या वाणाचे
ठळक वैशिष्टय पूढील प्रमाणे आहेत. पांढऱ्या रंगाचे दाणे, पिकाचा कालावधी 88 ते 92 दिवस
(सरासरी 90 दिवस) एकरी लागणारे बियाणे 1 किलो प्रति एकर, पेरणीचा कालावधी- जानेवारी
ते मार्च विशषत: फेब्रुवारीचा पहिला आठवडा,
तेलाचे प्रमाण 52 टक्के पर्यंत. सरासरी उत्पन्न 3 ते 3.50 क्वि. प्रति एकर, जिवाणु
करपा तसेच इतर प्रमुख किडी व रोगांना प्रतिकारक्षम आहे.
या वाणाची
पेरणी 30x15 सेमी अंतरावर 2.50 सेमी खोलीपर्यंत करावी व मातीच्या पोतानुसार 12 ते
15 दिवसाच्या अंतराने पाणी दयावे.
महाबीज
उत्पादित PKVNT-11 वाणाचे दर्जेदार बियाणे
1 किलो पॅकिंग मध्ये 280 प्रति किलो दराने लातूर जिल्ह्यातील महाबीजचे विक्रेते व उपविक्रेते
यांच्याकडे उपलब्ध् आहे. शेतकऱ्यांनी या वाणाचे बियाणे पेरणी करुन भरघोस उत्पन्न मिळवावे
असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाबीज, लातूर यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment