दयानंद महाविद्यालय परिसरात पोलीस चौकीचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

                                                दयानंद महाविद्यालय परिसरात पोलीस चौकीचे

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

*लातूर दि.27 ( जिमाका ):-* शहरातील नामांकित दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद महाविद्यालय परिसरात एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे अंतर्गत नूतन दयानंद महाविद्यालयात पोलीस चौकीचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमनजी लाहोटी, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी उपस्थित होते.  

या भागातील लोकांची मागणी व महाविद्यालयात परिसरात वाढणारी संख्या आणि मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आली असून इथे कायम सुरक्षेसाठी चौकीत पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.  

कार्यक्रमास नगरसेवक पपू देशमुख, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. सोळुंके, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राध्यापक, शिक्षक, या भागातील नगरसेवक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                   0000  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा