जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पध्दतीस फाटा देवून रेशीम उद्योगाची कास धरावी

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पध्दतीस

फाटा देवून रेशीम उद्योगाची कास धरावी

 

लातूर,दि.5,(जिमाका):- जिल्ह्यात रेशीम उद्योगास वाढीस चांगला वाव आहे. जिल्ह्यातील वातावरण देशातील सर्वात जास्त रेशीम उत्पादन असणाऱ्या कर्नाटक राज्याप्रमाणेच असल्याने रेशीम शेतीस वातावरण पुरक आहे. सद्या शेतकऱ्यांना इतर पिकात अतिवृष्टी / दुष्काळाचे होणारे धोके लक्षात घेता जिल्ह्यात ४०६ शेतकऱ्यांनी ४२५ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन पारंपारिक पीक पध्दतीस फाटा देत. रेशीम उद्योगाची कास धरली असल्याचे रेशीम विकास अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

          सन २०१६-१७ या वर्षापासून रेशीम शेती ( उद्योगाचा ) समावेश हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत करण्यात आला आहे. मनरेगा योजनेतंर्गत रेशीम उद्योगास एक एकर क्षेत्रावर तुती लागवड व कोष संवर्धन योजनेस शासनाकडून कुशल व अकूशल स्वरुपात तीन वर्षाकरीता रक्कम  रु.३ लाख ३२ हजार अनुदान देय आहे.तसेच नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पा (पोकरा)अंतर्गत रेशीम उद्योगास रक्क्म रु.२ लाख ७५ हजार अनुदान देय आहे.

          रेशीम उद्योग बहूवर्षीक पीक असल्याने एकदा लागवड केल्यानंतर १२ ते १५ वर्षांपर्यत पुन्हा-पुन्हा लागवडीचा खर्च येत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या किटक नाशकांचा फवारणी खर्च येत नाही. या  एक एकर क्षेत्राच्या तुतीच्या पाल्यावर रेशीम किटक संगोपन करुन प्रथम पहिल्या वर्षी  ५० ते ६० हजार व दुसऱ्या वर्षापासून तीन-चार वेळा रेशीम किटकाचे संगोपन करता येत असल्याने त्यापासून १ लाख ५० हजार ते दोन  लाखापर्यत लाभार्थी उत्पादन घेऊ शकतो.

       जिल्ह्यात औसा व रेणापूर तालुक्याच्या परिसरातील शेतकरी १५ ते २० वर्षा पासून रेशीम उद्योग करत असून  एका महिन्यात  रेशीम उद्योगापासून रु.७५ हजार  ते एक लाखापर्यंत उत्पादन घेत आहेत, असे वर्षभरात तीन ते चार वेळा पिक घेता येतात. यामूळे शेती कामासाठी लागणा-या कामाकरिता रेशीम लाभार्थीना सरकारी नौकरदारप्रमाणे दर दोन महिन्याला रेशीम लाभार्थ्याच्या  हातात पैसा उपलब्ध होत असल्याने रेशीम लाभार्थी सद्या रेशीम कोष निर्मीतीकडे कल वाढत आहे. जिल्ह्यातील लाभार्थी यांनी  दोन महिन्यात पूढीलप्रमाणे उत्पादन घेतले आहे.

लातूर तालुक्यातील हंरगूळ  येथील शेतकरी लाभार्थी राजकुमार बरुरे यांनी घेतलेले उत्पादन रुपये 2 लाख 55 हजार 539 , लाभार्थी जिदासाब शेख यांनी घेतलेले उत्पादन रुपये 1 लाख 47 हजार , लाभार्थी सतीष सुरकूटे यांनी घेतलेले उत्पादन रुपये 1 लाख 31 हजार , लाभार्थी महेश उपाडे यांनी 1 लाख 27 हजार उत्पादन घेतलेले आहे.

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील लाभार्थी गोविद आलूरे यांनी घेतलेले उत्पादन रुपये 1 लाख 15 हजार रुपये, औसा तालुक्यातील  करजगाव  येथील लाभार्थी बाबुराव वाकसे यांनी घेतलेले उत्पादन रुपये 1 लाख 1 हजार 806 रुपये, रेणापूर तालुक्यातील मोहगाव येथील लाभार्थी कल्याण पाटील यांनी घेतलेले उत्पादन रुपये 99 हजार 260, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील लाभार्थी अंनतेश्वर लामतूरे यांनी 96 हजार 645 रुपये, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील अंजणी येथील लाभार्थी सौ.दुर्गाबाई शिंदे यांनी घेतलेले उत्पादन रुपये 87 हजार रुपये, रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील लाभार्थी सिदेश्वर कागले यांनी घेतलेले उत्पादन रुपये 70 हजार 559 रुपये उत्पादन घेतलेले आहे.  

 जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. हे रेशीम उद्योग वाढीसाठी  विशेष लक्ष  दिले आहे. याकरिता रेशीम विभाग व कृषी विभाग रेशीम उद्योग वाढीसाठी विशेष पर्यत्न करीत आहे. सद्या कोषाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ (प्रती कि.ग्रा. दर रुपये 600 ते 700) झाल्याने ग्रामीण भागातील रेशीम लाभार्थीच्या अर्थकारणात चांगला बदल होत असल्याचे चित्र जिल्ह्ययात निर्माण होत आहे.

सन 2021-22 या वर्षात पोकरातंर्गत तुती लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी झालेली  होती, मात्र कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावामुळे ज्या शेतकऱ्याना मागील वर्षी लागवड करता आलेली नाही. त्यांनी त्याच सभासद नोंदणी वर यावर्षीदेखील लागवड करण्याची त्यानी कृषी विभागाकडे माहीती द्यावी.

  महा-रेशीम अभियान-२०२२ मध्ये सन 2022-23 मनरेगातंर्गत जिल्ह्यात 400 सभासदानी नोंदणी केलेली आहे, त्यांनी आपले नाव कृती आराखडयात नोंदवावे .

जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये करावयाच्या तुती लागवडीसाठी दि. 15 जानेवारी, 2022 पर्यंत एक दिवसीय नर्सरी प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे. नोंदणीधारक शेतक-यांनी यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा, अस, अवाहन  जिल्हा विकास रेशीम अधीकारी, .एस.बी वराट  यांनी केले आहे.

                                                                               

 

                                                 0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा