बहुआयामी समाजसेवकाच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान --सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

बहुआयामी समाजसेवकाच्या निधनाने

महाराष्ट्राचे मोठे नुकसान

--सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख


मुंबई, दि. २७:- प्रसिध्द साहित्यिक, उत्तम वक्ता, संवेदनशील लेखक आणि समाज व्यसनमुक्त करण्यासाठीची धडपड करणाऱ्या बहुआयामी समाजसेवक डॉ. अनिल अवचट निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाली असल्याची भावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री  अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, श्री. अवचट यांनी 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा'च्या माध्यमातून अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. तर त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे अनेक प्रश्न आपल्यासमोर मांडले. त्यांच्या कार्यातून आणि पुस्तकांमधून डॉ. अवचट यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्व आणि प्रतिभेचे दर्शन आपल्याला घडले आहे. त्यांच्या जाण्याने व्यसनमुक्तीसाठी झटणारे एक संवेदनशील व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असून डॉ. अवचट यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु