विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2022 अंतर्गत- रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

 

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2022 अंतर्गत-

रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

 

        लातूर,दि.7,(जिमाका):-  भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार दिनांक 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला होता. या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2021 ते 05 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात आले व सदर दावे व हरकती वर निर्णय घेण्यात येऊन अंतिम मतदार यादी दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी  कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील  कार्यालय सर्व मतदान केंद्र  व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयाचे संकेतस्थळ https://ceo.maharashtra.gov.in  येथे  प्रसिध्द  करण्यात  आली  आहे.

         या कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यात 06 विधानसभा मतदारसंघांतर्गत दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यानुसार लातूर जिल्ह्यात एकूण 48943 (पुरुष मतदार - 26793 + स्त्री मतदार-22140+इतर 10) मतदारांची वाढ झालेली आहे. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सदर नवमतदार यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. तसेच,जुन्या मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मतदारांच्या विनंती अर्जानुसार नावामध्ये दुरुस्ती करणे, विधानसभा मतदारसंघांतर्गत नाव स्थलांतर करणे ई.कामेही  करण्यात आली आहेत.  

            लातूर जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदार संख्या :- विधानसभा मतदारसंघ, पुरुष, महिला, इतर व एकुण पुढील प्रमाणे आहे. 234- लातूर ग्रामीण पुरुष-171400, महिला-151329, इतर-1, एकुण- 322730, 235- लातूर शहर- पुरुष-191204, महिला-174557, इतर-8, एकुण-365769,236-,अहमदपूर-पुरुष-173340,महिला-152186,इतर-1,एकुण-325527, 237-उदगीर (अ.जा.) पुरुष-160295, महिला-141878, इतर-2, एकुण-302175, 238- निलंगा- पुरुष-168717, महिला-149995,इतर-3, एकुण- 318715, 239- औसा- पुरुष-153018, महिला- 133868, इतर-2,एकुण- 286888 विधानसभा मतदारसंघ एकुण- पुरुष 1017974, महिला-903813,इतर-17, एकुण- 1921804.

            जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व उपजिल्हा निवडणूक अधिकारी सदाशिव पडदुणे यांचे मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात 06 विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे माध्यामातून प्रत्येक मतदान केंद्रावर नवीन मतदार नोंदणी करण्यात आली आहे.

                                                            ****

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु