स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष मोहिम बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करणे व आवश्यक कागदपत्रे सादर करावेत

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष मोहिम

बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी

ऑनलाईन अर्ज करणे व आवश्यक कागदपत्रे सादर करावेत

 

लातूर दि.13 (जिमाका) पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राचे अनन्य साधारण महत्व आहे. जून ते ऑगस्ट या कालावधी मध्ये अशा अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु होतात. या काळात ऐनवेळी या प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होते. अनेकदा प्रवेशाच्या वेळी हे प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होतात.

वेळोवेळी आवाहन करुनही अद्याप या विद्यार्थ्यांनी पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अद्याप अर्ज केलेले नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेवून बीड जिल्हा जात पडताळणी कार्यालयाने लातूर जिल्ह्यात शिकत असलेल्या मूळ बीड जिल्हा वासीय विद्यार्थी ज्यांचे जात प्रमाणपत्र बीड जिल्ह्यामधील आहे. अशा इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याकरिता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष मोहिम सुरु केली आहे.

तरी या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकिय विश्रामगृह समोर, नगर रोड बीड या समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा ऑनलाईन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in  करुन अर्ज व आवश्यक ते पुरावे कार्यालयात प्रत्यक्ष दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                     0000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु