जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजातील इच्छुक संस्था व व्यक्तींनी पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करावेत

 

जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजातील

इच्छुक संस्था व व्यक्तींनी पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल  करावेत

 

लातूर दि.11 ( जिमाका ) जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजातील इच्छूक संस्था व व्यक्ती यांनी या पुरस्कार संदर्भात संबंधीत जिल्ह्याच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडील विहीत नमुन्यामध्ये प्रस्ताव दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय लातूर येथे सादर करावा असे आवाहन सहायक आयुक्त्‍ समाज कल्‍याण एस.एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

शासन निर्णयान्वये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार वीरशैव- लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करित असलेल्या व्यक्तींच्या व संस्थांच्या कामाची दाद / दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी समाज सेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तींसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सदर पुरस्कार देण्याकरीता जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी संबंधीत जिल्ह्याच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडेक सीलबंद लिफाफ्यात रितसर अर्ज करावेत.  या  पुरस्कारासाठी पात्रते बाबतची नियमावली दि. 8 मार्च 2019 रोजच्या शासन निर्णयात असून महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट संबंधीत शासन निर्णय असून ज्याचा सांकेतांक 201903082039003522 असा आहे.

 

                                                   *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा