जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या काटेकोर विनियोगाचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
जिल्हा
वार्षिक योजनेतील निधीच्या काटेकोर विनियोगाचे
पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
लातूर
दि.13 (जिमाका) :- जिल्हा
वार्षिक योजनेतील निधीच्या काटेकारपणे विनियोग करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित
देशमुख यांनी दिले. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्हा नियोजन
समितीची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते
बोलत होते.
या दूरदृश्य बैठकीस राज्यमंत्री संजय
बनसोडे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, लातूर खासदार सुधाकर श्रृगांरे,
उस्मानाबाद खासदार ओमराजे निंबाळकर,
आ.
बाबासाहेब पाटील,आ. धीरज देशमुख, आ. अभिमन्यु पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी., जिल्हा नियोजन अधिकारी श्री. दुशिंग आदि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांची
यावेळी उपस्थिती होती. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर आज लातूर
जिल्हा नियोजन समितीची बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतली. बैठकीच्या
प्रारंभी मागील इतीवृत्ताच्या अनुपालनास मंजुरी दिल्यानंतर सन २०२१-२२ वार्षिक योजनेतील कामकाजाचा आढावा घेतला.
त्यानंतर २०२२-२०२३ जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी दिली.
पालकमंत्री अमित देशमुख यावेळी
म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील अर्धवट कामाचा तालूकानिहाय आढावा घेऊन ती तातडीने
पूर्ण करावीत तसेच चालू आर्थिक वर्षातील अखर्चित निधी वेळेत योग्य पद्धतीने खर्च
करून योजना पूर्ण कराव्यात. लोकप्रतिनिधींकडून आलेल्या जिल्ह्याच्या सर्वांगिण
विकासाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला जाईल, असे
वर्तन अधिकारी वर्गांकडून व्हावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली. लातूरच्या प्रशासकीय
परंपरेला धक्का बसणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही निर्देशही
पालकमंत्री श्री. देशमुख यांनी या बैठकीदरम्यान दिले आहेत.
जिल्ह्यातील
स्मशानभूमी, दफनभूमी, दहनभूमीसाठी येथे जागा उपलब्धतेसाठी जिल्हा प्रशासनाने
तालुकानिहाय गाव निहायसूची करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्यासाठी
वीजेची आवश्यकता असते. त्यासाठी लागणारे डी. पी. येत्या 10 फेब्रुवारी, 2022
पर्यंत पूर्ण करण्यात यावेत. तसेच जिल्ह्यातील मागील वर्षातील अनेक कामे अर्धवट
राहिलेले प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत खबरादारी घ्यावी, असेही पालकमंत्री अमित
देशमुख यांनी बैठकीत सांगितले.
0000
Comments
Post a Comment