नाविण्यापूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ

 

नाविण्यापूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ

         लातूर दि.17 (जिमाका):-नाविण्यपूर्ण येाजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने निवड झालेल्या व प्रतिक्षाधीन लाभार्थ्यांनी डॉक्यूमेंट्स अपलोड करण्याची सुविधेस दि. 19 जानेवारी 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी- मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे. (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह), अशा लाभार्थ्यांनी दि. 12 जानेवारी 2022 (सकाळी 10.00 पासून) पशुसंवर्धंन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सूविधा उपलब्ध्‍ करुन देण्यात आलेली होती.

            निवड झालेल्या (प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांसह) लाभार्थ्यांनी दि. 19 जानेवारी 2022 रात्री 12.00  वा. पर्यंत या विहित मुदतीत कागपत्रे अपलोड करण्याची संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी . या बाबत सर्व संबंधित पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचे मार्फत लाभार्थ्यांना सदर बातमी/ मेसेज/ दुरध्वनी/ ई-मेल ई. व्दारे जाईल याची खात्री करावी.

यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com आहे. अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव- AH-MAHABMS (google play store) आहे. व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी- दि. 12 जानेवारी 2022 (सकाळी 10.00 पासून) ते दि. 19 जानेवारी 2022 (रात्री 12.00 वा. पर्यंत) आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा