जिल्हा वार्षिक योजनेच्या 290 कोटीच्या
आराखड्यास मंजूरी
- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
§ जिल्हा
वार्षिक योजनेच्या खर्चामध्ये राज्यात चौथा तर मराठवाडा विभागात लातूर जिल्हा पहिला
§ लातूर
जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्याची केली पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली मागणी
लातूर दि.21(जिमाका):- लातूर जिल्ह्याने नाविन्यपूर्ण योजनेत Umang Autism and Metastability Center (Sensory Garden) हे संपूर्ण देशात केरळ राज्यानंतर लातूर जिल्ह्याने सुरु केले याचे कौतुक करून इतर जिल्ह्याने या अत्यंत चांगल्या योजनेचे अनुकरण करावे असेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच लातूर जिल्हा खर्चामध्ये मराठवाडा विभागात पहिला, तर राज्यात चौथ्या क्रमांकावर असल्याबद्दलही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशंसा केली. 2022-23 च्या 290 कोटीच्या प्रारूप आराखड्यास तत्वतः मंजूरी दिली.
जिल्ह्याची जिल्हा वार्षिक योज
ना 2022-23 च्या प्रारुप आराखड्याला मान्यता देण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.
या बैठकीस राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य तथा लातूर
जिल्हा पालकमंत्री अमित देशमुख, राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक
बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भुकंप पुर्नवसन, संसदीय कार्य राज्यमंत्री
संजय बाबुराव बनसोडे, आमदार धिरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार इत्यादी उपस्थित होते.
तर आमदार विक्रम काळे हे औरंगाबाद येथून उपस्थित होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,
लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी म.शं.दुशिंग व
जिल्ह्यातील इतर यंत्रणेचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या प्रारुप आराखड्याचे सादरीकरण केले. त्यामध्ये सन 2021-22 अंतर्गत प्राप्त तरतूद रुपये 275 कोटीच्या अधिन राहून रुपये 158.79 कोटीच्या प्रशासकीय मान्याता देऊन रुपये 136.14 कोटी निधी वितरीत करण्यात आल्याचे सांगितले. वितरीत निधीपैकी रुपये 121.43 कोटी खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी 44.15 टक्के असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
तद्नंतर शासनाने सन 22-23 वर्षाकरीता प्रस्तावित केलेल्या नियतव्ययानुसार
रुपये 229.75 कोटीचा आराखडा बैठकीसमोर ठेवण्यात
आला. त्यात यंत्रणाकडून एकुण मागणी 480.10 असुन वाढीव मागणीनुसार रुपये 250.34 कोटी
असून त्यापैकी किमान रुपये 177.34 कोटी अतिरीक्त मागणीची आवश्यकता असल्याचे सांगून
त्याचे विभागनिहाय सादरीकरण जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.
पालकमंत्री अमित देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांना लातूर जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्याची विनंती केली. तसेच खर्चामध्ये लातूर
जिल्हा मराठवाडा विभागात पहिला, तर राज्यात चौथ्या क्रमांकावर असल्याने प्रोत्साहन
निधी म्हणून रुपये 50.00 कोटीच्या निधीची मागणी केली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर प्रोत्साहनास
लातूर जिल्हा पात्र ठरल्यास तो निधी देण्याचे मान्य केले. राज्यमंत्री संजय बनसोडे,
आमदार धिरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार यांनीही लातूर जिल्ह्यासाठी निधी वाढवून मिळण्याबाबतची
आग्रहाची विनंती केली.
शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्याकरीता
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2022-23 साठी रुपये 290 कोटी निधीस तत्वत: मान्यता
दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या
परवानगीने बैठक संपल्याचे जाहिर करण्यात आले.
00000
Comments
Post a Comment