पत्रकार दिन आणि बाळाशास्त्री जांभेकर...!!
विशेष लेख
-7
पत्रकार दिन आणि बाळाशास्त्री जांभेकर...!!
मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री
जांभेकर यांनी आज दर्पण सुरु केले ... तो दिवस आपल्या राज्यात आज पत्रकार दिन म्हणून
ओळखला जातो...!!
काय योगदान होतं बाळशास्त्री जांभेकराचं
हे कळावं म्हणून आजच्या दिनाचं औचित्य साधून त्यावर प्रकाश टाकतो आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या समाजाला आपला
इतिहास माहिती नाही तो समाज भविष्य घडवू शकत नाही... म्हणून अशा थोर व्यक्तींची माहिती
मिळाली पाहिजे म्हणून हा लेख प्रपंच...!!
• बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म
20, फेब्रुवारी 1812 चा, मुंबईत 1825 साली आले ..
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत शिक्षण घेऊन केवळ त्यांच्या बौद्धिक सामर्थ्यावर
वयाच्या 20 व्या वर्षी एलिफ़िस्टन कॉलेज मध्ये सह प्राध्यापक झाले. कदाचित भारतातील
पहिले प्राध्यापक असावेत जे इंग्रजी शिकवत
• अनेक लिप्यांचे अभ्यासक असल्यामुळे
कोकणातील प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट यांचा अभ्यास करून त्यांनी शोध निबंध लिहले.त्यामुळे
भारतातील पुरातत्व विषयाचे पहिले अभ्यासक म्हणूनही त्यांचं नाव आहेच
• संत ज्ञानेश्वरांनी लिहलेली ज्ञानेश्वरी
मराठीतून मुद्रित करून समस्त मराठी भाषकांच्या
घराघरात ज्ञानेश्वरी पोहचविण्याला मोठा हातभारही जांभेकरांनी लावला.
• गणित आणि खगोलशास्त्रातली त्यांची गती
ओळखुन तत्कालीन सरकारने त्यांना कुलाबा वेध शाळेचे संचालक म्हणूनही नियुक्त केलं होतं
• सर्व विषयांचा सखोल अभ्यास असलेल्या
जांभेकरांना मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणूनही तत्कालीन सरकारने
त्यांची नियुक्ती केली. त्याकाळात त्यांनी मराठी भाषेत पाठयपुस्तक लिहली.
ते पत्रकार होते, साडेआठ वर्षे त्यांनी
दर्पण चालवले त्यांनतर दिग्दर्शन नावाचे पूर्णपणे शिक्षणाच्या प्रसाराला वाहिलेले मासिक
काढले. त्यात त्यांना त्यांचे विद्यार्थी दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजीलाड यांनी मदत
केली होती.
पत्रकार दिना
निमित्त माध्यमात काम करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... !!
@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी,लातूर
Comments
Post a Comment