नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावेत

 

नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी

कागदपत्रे अपलोड करावेत   

         लातूर दि.14 (जिमाका) :- नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी - मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येत आहे. अशा लाभार्थ्यांनी दि. 12 (सकाळी 10.00 पासून) ते 16 जानेवारी 2022 ( रात्री 12.00 वा.पर्यंत ) या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

            निवड झालेल्या (प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांसह) लाभार्थ्यांनी दि. 16 जानेवारी 2022 रात्री 12.00  वा. पर्यंत या विहित मुदतीत कागपत्रे अपलोड करण्याची संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी . यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com आहे. अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव- AH-MAHABMS (google play store) आहे. व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कालावधी - दि. 12 जानेवारी 2022 पासून सकाळी 10.00 वाजल्यापासून  सुरुवात झालेली आहे.  शेवटची दि. 16 जानेवारी 2022 (रात्री 12.00 वा. पर्यंत) आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु