पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते येत्या गुरुवारी जिल्ह्यातील 102 पाणंद रस्त्यांचे ऑनलाईन भुमिपूजन

 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते येत्या गुरुवारी

जिल्ह्यातील 102 पाणंद रस्त्यांचे ऑनलाईन भुमिपूजन

 

·         जिल्ह्यातील 10 कोटींच्या कामांचे ऑनलाईन भुमिपूजन

 

          लातूर,दि.25 (जिमाका):-  जिल्ह्यातील  102 पाणंद रस्त्यांचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य  मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री  अमित देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन दिनांक 27 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन वाघमारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

यात लातूर तालुक्यातील 35 रस्ते, निलंगा तालुक्यातील 11 रस्ते, औसा तालुक्यातील 8 , जळकोट  तालुक्यातील 6 रस्ते, चाकूर तालुक्यातील 8 रस्ते, अहमदपूर तालुक्यातील 7 रस्ते, देवणी तालुक्यातील 7 रस्ते, शिरुर अनंपाळ तालुक्यातील 5 रस्ते, रेणापूर तालुक्यातील 3 रस्ते, उदगीर तालुक्यातील 12 रस्ते असे जिल्ह्यातील एकूण 102 रस्त्यांचे ऑनलाईन भुमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास खासदार , आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहेत.

जिल्हा नियोजन समिती, लातूर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-2021 साठी जनसुविधेसाठी विशेष अनुदान योजनेतंर्गत पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेसाठी रक्कम रुपये 10 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या सर्व 102 कामांना 25 जानेवारी, 2021 रोजी मान्यता देवून या कामांची प्रशासकीय मान्यता 29 सप्टेंबर, 2021 रोजी प्रदान करण्यात आलेली आहे. 

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत