लाभार्थी निवडीसाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत

 

लाभार्थी निवडीसाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत

 

लातूर,दि.20(जिमाका):- जिल्ह्यातील इच्छुक पात्र चाकूर, रेणापूर व शिरुर अनंपाळ तालुक्यातील सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजने करीता काम करणाऱ्या प्रति तालुका एक लाभार्थी निवडीसाठी लाभार्थिंनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 21 जानेवारी 2022 ते 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कडे सारद करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.एस. कदम यांनी केले आहे.

सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर व शिरुरु अनंतपाळ या तालुक्यातून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेकरिता काम करु इच्छीणाऱ्या लाभधारकांची प्रति तालुका एक लाथार्थिची निवड करावयाची आहे.

या प्रकल्पाची  एकूण किंमत रु. 10 लाख 27 हजार 500 पैकी सर्व प्रवर्गातील लाथार्थिंना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच रु. 5 लाख 13 हजार 750 देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाथार्थि स्वताचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज घेवून उभा करु शकेल असेही पत्रकात नमुद केले आहे.

 

                                              ****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा