लातूर महानगरपालिका नजिकच्या २७ गावांचे एकात्मिक विकास आराखडे तयार करावेत अंमलबजावणीसाठी पाठपुरावा यंत्रणा उभारावी - पालकमंत्री अमित देशमुख
लातूर महानगरपालिका नजिकच्या २७ गावांचे एकात्मिक विकास आराखडे तयार करावेत
अंमलबजावणीसाठी पाठपुरावा यंत्रणा उभारावी
- पालकमंत्री अमित देशमुख
§ नवीन योजनांचे तातडीने प्रस्ताव तयार करून सादर कारावेत
§ शहराच्या झालर क्षेत्रात येणाऱ्या वस्त्यामध्ये मनपाकडून मुलभुत सुविधा पुरवाव्यात
§ नकाशावर असलेले शेतरस्ते प्राधान्याने खुले करून त्याचे मजबुतीकरण करावे
§ काही गावात शहराच्या धर्तीवर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे पथदर्शी प्रकल्प
राबवावेत
§ प्रत्येक गावात संरक्षक भिंत व शेडसह स्मशानभूमी उभारावी
§ दलित वस्ती आणि तांडा वस्ती विकासाच्या योजना एकात्मिक पद्धतीने राबवाव्यात
§ प्रत्येक गावात शुद्ध पाणी पुरवठा योजना राबवावी
§ शाळामधील स्वच्छतागृहाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी
§ ग्रामपंचायतीसाठी प्राधान्याने सौर प्रकल्प उभारावेत
लातूर, (जिमाका) 28:- लातूर महानगरानजिकच्या २७ गावांचे स्वतंत्र विकास आराखडे तयार करावेत. तसेच विविध योजनांचे प्रस्ताव तयार करून त्यांची मंजुरी व अंमलबजावणीसाठी पाठपुरावा यंत्रणांनी उभारावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत .
पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर महानगरानजिकच्या चार जिल्हा परिषद सर्कलमधील पाखरसांगवी, खंडापूर, वासनगाव, गंगापूर, खोपेगाव, चांडेश्वर, पेठ, कव्हा, हरंगुळ (बु), श्याम नगर (१२ नं.पाटी), खाडगाव, वरवंटी, बसवंतपूर, हरंगुळ (खु), रायवाडी, साई, बाभळगाव, शिरशी, कातपूर, महाराणाप्रताप नगर, सिकंदरपूर , महापूर, नांदगाव ,बोरवटी, आर्वी, कासरगाव, हनमंतवाडी या गावातील लोकप्रतिनिधी, महसूल, जिल्हा परिषद, पाटबंधारे, पोलीस, परिवहन, क्रीडा, टाऊन प्ल्यानिंग, भूमापन, कृषी, वनीकरण, महावितरण यासह सर्व विभागाचे अधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहावर प्रत्येक गावाचा योजनानिहाय आढावा घेतला. पूर्ण झालेली कामे, चालू असलेली कामे, प्रस्तावित योजना आणि भविष्यात राबवावयाच्या योजना यावर सविस्तर चर्चा केली.
नवीन योजनांचे तातडीने प्रस्ताव तयार करून सादर कारावेत. तसेच लातूर शहराच्या झालर क्षेत्रात येणाऱ्या वस्त्यामध्ये महापालिकेकडून पाणीपुरवठा व इतर सुविधा पुरवाव्यात, नकाशावर असलेले शेत रस्ते प्राधान्याने खुले करून त्याचे मजबुतीकरण करावे, काही गावात शहराच्या धर्तीवर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत, प्रत्येक गावात संरक्षक भिंत व शेडसह स्मशानभूमी उभारावी, दलित वस्ती आणि तांडा वस्ती विकासाच्या योजना एकात्मिक पद्धतीने राबवाव्यात, प्रत्येक गावात शुद्ध पाणी पुरवठा योजना राबवावी, ग्रामपंचायत व शाळांच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारून त्याच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, ग्रामपंचायतीसाठी प्राधान्याने सौर प्रकल्प उभारावेत, जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व विभागांचे मिळून गावनिहाय समाधान शिबिराचे आयोजन करावे आदीं निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी बैठकीत दिले.
या बैठकीस नियोजन समितीचे सदस्य किरण जाधव, नियोजन समिती सदस्य ऍड. समद पटेल, विजय देशमुख, प्रताप पाटील, उपविभागीय अधिकारी लातूर सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, जिल्हा परिषद सदस्य रमेश थोरमोठे, परमेश्वर वाघमारे, शोभा पंडित ढमाले, सुभाष जाधव, पंचायत समिती सदस्य रघुनाथ शिंदे, राम चामे, शीतल तानाजी फुटाणे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे एस.जी.गंगथडे, जि.प.पाणीपुरवठा अभियंता बाळासाहेब शेलार, पोलीस उप अधीक्षक (ग्रामीण) सुनील गोसावी, उप विभागीय कृषी अधिकारी महेश क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत समिती) दत्तात्रय गिरी, उप अभियंता (सा.बा.) रोहन जाधव, कार्यकारी अभियंता महावितरण गणेश सामसे, प्रभारी अधीक्षक अभियंता पी.आर.पुनसे, सहायक आयुक्त समाजकल्याण शिवकांत चीकुर्ते, जलसंपदा कार्यकारी अभियंता रोहित जगताप, सुभाष घोडके विविध गावचे सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment