जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक हद्दीतील सर्व मद्य विक्री बंद आदेश जारी

 

जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक

हद्दीतील सर्व मद्य विक्री बंद आदेश जारी

 

        * लातूर दि.14 (जिमाका) :-* जिल्ह्यातील निलंगा, उदगीर, जळकोट, अहमदपूर तालुक्यातील अशा एकूण चार तालुक्यात अनुक्रमे निलंगा - कलमुगळी, उदगीर- कुमदाळ ( हेर), जळकोट- जगळपूर (बु), केकतसिंधगी, होकर्णा, अहमदपूर - आनंदवाडी या ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी निवडणूक दिनांक 18 जानेवारी, 2022 रोजी होणार असून दिनांक 19 जानेवारी, 2022 रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशान्वये तसेच महाराष्ट्र मद्य निषेध कायदा -1949 व त्याअंतर्गत विविध नियमातील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी. पी. यांनी निलंगा - कलमुगळी, उदगीर- कुमदाळ ( हेर), जळकोट- जगळपूर (बु), केकतसिंधगी, होकर्णा, अहमदपूर - आनंदवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांचे मद्य विक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जारी कले आहेत. अनुज्ञप्ती बंद ठेवावाची तारीख व बंद ठेवावयाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 16 जानवोरी, 2022 रोजी मतदान संपण्यापूर्वी 48 तास आधी म्हणजे सायंकाळी 6-00 वोजपासून बंद ठेवावयाचा कालावधी असून दिनांक 17 जानेवारी, 2022  रोजी मतदानाच्या पूर्वीचा दिवस-संपूर्ण दिवस दिनांक 18 जानेवारी, 2022 रोजी मतदानाचा दिवस - संपूर्ण दिवस व दिनांक 19 जानेवारी, 2022 रोजी मत मोजणीचा दिवस - मतमोजणी संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवावयाचा कालावधी आहे.

या आदेशाची निलंगा, उदगीर, जळकोट, अहमदपूर या तालुक्यातील नमूद ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील. त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (१) (सी) नुसार तसेच अनुषंगिक नियमांनूसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु