पत्रकार दिना निमित्त जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन

 

पत्रकार दिना निमित्त जिल्हा माहिती कार्यालयात

बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन

 

लातूर,दि.6 (जिमाका):- आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये ‘दर्पण’ हे नियत कालिक सुरु करुन मराठीतले अद्य वर्तमान पत्र म्हणून पाया रचला तो दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणून आज साजरा केला जातो. लातूर जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून आज त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास साप्ता. हॅलो लातूरचे संपादक पंकज जैसवाल, साप्ता.समृध्द व्यापारचे श्री.परळकर, छायाचित्रकार अमोल घायाळ, राजेंद्र गुडापे, या कार्यालयातील सिनेयंत्र चालक आश्रूबा सोनवणे, सर्व साधारण सहाय्यक अहेमद बेग, वाहन चालक सिध्देश्वर कोंपले, संदेश वाहक व्यंकट बनसोडे उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु