व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील 139 नगर पंचायत अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत-जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या पहिल्या अडीच वर्षासाठी अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर

 

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील 139

नगर पंचायत अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत

 

जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या पहिल्या अडीच वर्षासाठी

अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर

 

लातूर,दि.27(जिमाका):- लातूर जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या पहिल्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदासाठीची सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात नगरपंचायत शिरुर अनंतपाळ अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला, नगर पंचायत चाकूर अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण, नगर पंचायत देवणी अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती, नगर पंचायत जळकोट अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला , नगर पंचायत रेणापूर अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आहे, नगर परिषद प्रशासन विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्यातील 139 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत मंत्रालय, मुंबई येथे प्रधान सचिव ( नवि-2) यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणाली               ( व्हिडीओ कॉन्फरन्स व्ही.सी.) द्वारे आयोजित करण्यात आली होती. 

सद्यस्थितीत कोविड-19 च्या संक्रमणामुळे विहीत केलेले आरोग्य  विषयक निकष विचारात घेता, या सोडतीसाठी संबंधित अधिकारी / लोक प्रतिनिधींनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतही पत्रकानुसार  कळविले होते. 

तसेच या सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात दहा लोक प्रतिनिधींना ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000   

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा