Posts

Showing posts from July, 2024

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑगस्टमध्ये शिबिरांचे आयोजन

  लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑगस्टमध्ये शिबिरांचे आयोजन लातूर ,  दि. 31 (जिमाका) :  उदगीर ,  अहमदपूर ,  निलंगा तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीर कार्यालयात पक्की अनुज्ञप्ती नवीन वाहन नोंदणी इत्यादी कामकाज करण्यात येईल. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑगस्टमध्ये उदगीर येथे  5  ऑगस्ट,  12  ऑगस्ट,  19  ऑगस्ट, आणि  26  ऑगस्ट रोजी ,  अहमदपूर येथे  9  ऑगस्ट व  20  ऑगस्ट रोजी ,  निलंगा येथे  13  ऑगस्ट , 2024  रोजी शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे. ****

सुधारित वृत्त :- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात सहभागी व्हावे !

  ‘मुख्यमंत्री माझी शाळा ,  सुंदर शाळा’ अभियानात सहभागी व्हावे ! ·           सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांसाठी अभियान लातूर ,  दि. 31 (जिमाका) :  सन 2023-24 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले.   या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.   या अभियानात तालुका ,  जिल्हा ,  विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात आली.   आता  सन  2024-25  मध्येही   ‘ मु ख्यमंत्री माझी शाळा ,  सुंदर शाळा ’ अभियानाचा दुसरा  टप्पा काही नवनवीन उपक्रमासह राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी  ‘ मुख्यमंत्री माझी शाळा ,  सुंदर शाळा ’   अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यव

अभियानात सहभागी व्हावे ! · सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांसाठी अभियान

  अभियानात सहभागी व्हावे ! ·           सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांसाठी अभियान लातूर ,  दि. 31 (जिमाका) :  सन 2023-24 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले.   या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.   या अभियानात तालुका ,  जिल्हा ,  विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात आली.   आता  सन  2024-25  मध्येही   ‘ मुख्यमंत्री माझी शाळा ,  सुंदर शाळा ’ अभियानाचा दुसरा  टप्पा काही नवनवीन उपक्रमासह राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी  ‘ मुख्यमंत्री माझी शाळा ,  सुंदर शाळा ’   अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण

‘लातूर हरितोत्सव’मध्ये सहभागी होवूया, पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देवूया !

  ‘लातूर हरितोत्सव’मध्ये सहभागी होवूया, पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देवूया ! ·          14 जुलै रोजी गंजगोलाई परिसरात आयोजन लातूर ,  दि.  11 ( जिमाका) :  जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीन ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रविवार ,  14 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान   ' लातूर हरितोत्सव- 2024 '  या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंजगोलाई परिसरात होणाऱ्या या उपक्रमात एकाच ठिकाणी विविध प्रजातीच्या वृक्षांची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासोबतच वृक्ष लागवड ,  वृक्ष संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमात खासगी रोपवाटिकांचे स्टॉल लावण्यात येणार असून यासाठी 28 अधिक खासगी रोपवाटिकांनी नोंदणी केली आहे. यासोबतच शासकीय रोपवाटिकांचे स्टॉलही याठिकाणी राहणार आहेत. या उपक्रमामुळे औषधी वनस्पती ,  शोभेची झाडे ,  परसबागेमध्ये लावण्यायोग्य झाडे ,  फळझाडे व फुलझाडांची रोपे ,  वृक्षारोपणासाठी आवश्यक सेंद्रिय खते ,  कुंड्या व इतर आवश्यक साहित्य सवलतीच्या दरात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. लातूर ज

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा लातूर दि. 30 :  राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे बुधवार, 31 जुलै 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 31 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान येथे राखीव. सकाळी 9.30 वाजता लातूर येथून मोटारीने बिदर जिल्ह्यातील भालकीकडे प्रयाण करतील. सकाळी 11.31 वाजता भालकी येथील सन्मुखअप्पा कल्याण मंडप येथे रामेश्वर प्रभूअप्पा निटूरे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 12.15 वाजता भालकी येथून जळकोटकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता जळकोट येथील श्री गुरुदत्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित पूज्य कुमार स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य चंद्रकांत मारुती कांबळे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 4 वाजता जळकोट येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. ना. बनसोडे हे सायंकाळी 5 वाजता उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील श्री बा

महसूल सप्ताह अंतर्गत 1 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचे आयोजन

  महसूल सप्ताह अंतर्गत 1 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचे आयोजन लातूर दि. 30 :  महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये शासनाच्या पथदर्शी व अभिनव योजनांचा प्रचार ,  प्रसार व अंमलबजावणी ही या सप्ताहाची वैशिष्ट्ये असणार आहे. महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी महसूल विभागामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 ऑगस्टला महसूल सप्ताहास सुरवात होणार असून यादिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ,  2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ,  3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ,  4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ,  5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी ,  6 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा ,  तर 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद ,  उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ घेण्यात येणार आहे. *****

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत चर्चा

                                                   शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत चर्चा लातूर दि. 30 (जिमाका) :   क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सन  2024-25  मध्ये शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाविषयी  29  जुलै , 2024  रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये क्रीडा शिक्षकांच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लगडे यांनी प्रास्ताविकामध्ये क्रीडा शिक्षकांनी जास्तीत जास्त खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत क्रीडा शिक्षकांना आवाहन केले. उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी क्रीडा शिक्षकांनी आपल्या सेवेच्या कालावधीमध्ये किमान एक तरी राष्ट्रीय खेळाडू घडावावा ,  असे आवाहन केले. या बैठकीसाठी लातूर जिल्ह्यातील सुमारे  500  क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये श्री. बानवलेकर यांनी ऑनलाईन प्रवेशिका भरेणे ,  खेळाडू ओळखपत्र तयार करणे याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अर्जुन पुरस्कार प्राप

कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांच्या बलिदानाचे स्मरण

  कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांच्या बलिदानाचे स्मरण लातूर ,  दि. 29 (जिमाका) :  कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद युध्द स्मारक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून श्रध्दाजंली वाहण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) ,  सैन्य सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी ,  भारतीय माजी सैनिक संघटनेचे यांचे पदाधिकारी ,  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारी ,  माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी ,  वीरमाता व वीरपिता यावेळी उपस्थित होतेशहीद जवानांच्या वीरपत्नी ,  वीरपिता ,  वीरमाता यांचा शाल ,  पुष्पगुच्छ देवून यावेळी सन्मान करण्यात आला. *****

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर ,  दि. 29 (जिमाका) :  कायदा व सुव्यवस्था ,  सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके  यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3)  नुसार  संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 29 जुलै ,  2024 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते  12 ऑगस्ट ,  2024  रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.     शस्त्रबंदी व जमावबंदी  काळात या आदेशान्वये शस्त्रे ,  सोटे ,  तलवारी ,  भाले ,  दंडे ,  बंदुका ,  सुरे ,  काठ्या ,  लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी  वापरता येईल ,  अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही ,  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे ,  सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत ,  आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे ,  गाणे म्हणजे वाद्य वाजव