श्री तुळजाभवानी मंदिर संस्था आस्थापनेवरील पदभरतीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्था आस्थापनेवरील

पदभरतीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

लातूरदि. 10 (जिमाका) : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थेच्या आस्थापनेवर सरळ सेवेने भरावयाच्या वर्ग-3 आणि वर्ग-4 पदांची परीक्षा 13 जुलै आणि 14 जुलै 2024 रोजी तीन सत्रामध्ये घेण्यात या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी या परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

लातूर येथील नेटिझन्स डिजीटल झोन, कोळपा येथील संदिपानी टेक्नीकल कॅम्पस, निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याने परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींना शांततेस बाधा निर्माण होईलअसे कृत्य करता येणार नाही. 100 मीटरच्या परिसरात झेरॉक्स सेंटर्सपानटपरीटायपिंग सेंटरएसटीडी बुथध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोनसेल्युलर फोनई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीसवाहनास प्रवेश मनाई राहील.

परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारीकर्मचारी, परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारीकर्मचारी यांना, परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने हे आदेश लागू राहणार नाहीत.  13 जुलै2024 ते 14 जुलै2024 रोजी सकाळी 7 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु