रुग्णालय स्तरीय तक्रार अधिकारी यांना एचआयव्ही आणि एड्स कायद्याविषयी मार्गदर्शन

 रुग्णालय स्तरीय तक्रार अधिकारी यांना

एचआयव्ही आणि एड्स कायद्याविषयी मार्गदर्शन

लातूरदि. 11 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक अंतर्गत लातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालच्यावतीने रुग्णालय स्तरीय तक्रार अधिकारी यांच्यासाठी एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 2017, विषयक कार्यशाळा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत घेण्यात आली.

कार्यशाळेस मुख्य मार्गदर्शक म्हणून लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकारणचे सचिव तथा न्यायाधीश पी. पी. केस्तीकर उपस्थित होते. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे ॲड. ए.जे.तिवारीॲड. जी.जे. मिटकरी उपस्थित होते.

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना जीवन जगत असतांना भेदभाव आणि अन्य प्रश्नाला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 2017 हा कायदा करण्यात आला. या कायद्याचे धोरणस्थापनातक्रार व तक्रार निवारण यंत्रणालोकपाल व तक्रार अधिकारी यांची भूमिका इत्यादीबाबत रुग्णालय स्तरावर असलेले तक्रार अधिकारी यांना मार्गदर्शन झाले.

कार्यशाळचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप एम. ढेले यांनी केले. जिल्हा स्तरावरील एचआयव्ही, एड्सबाबत असलेल्या सेवा सुविधाबाबत माहिती दिली. उत्कृष्ठ काम केल्याबाबत देवणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. निलकंठ सगरकिल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. सुजाता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु