विनाअनुदानित क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी 19 जुलै रोजी बैठकीचे आयोजन

 विनाअनुदानित क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तरीय

क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी 19 जुलै रोजी बैठकीचे आयोजन

लातूरदि. 11 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सन 2024-2025 या वर्षात 44  विनाअनुदानित खेळ प्रकारांना मान्यता दिली आहे. या खेळांच्या जिल्हास्तर स्पर्धांचे आयोजन त्या-त्या खेळांच्या अधिकृत जिल्हा संघटनांची तांत्रिक आणि आर्थिक मदत घेवून करायचे आहे. यासाठी जिल्हास्तर शालेय स्पर्धांच्या आयोजनाची चर्चा करण्यासाठी 19 जुलै2024 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी संबंधित खेळ संघटनेच्या लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षसचिव यांनी कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

आपल्या खेळाच्या अधिकृत राज्य संघटनेची आपल्या जिल्हा संघटनेला मान्यता असल्याच्या पत्राची प्रत, आपल्या जिल्हा संघटनेची धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी केलल्या प्रमाणपत्राची प्रत, जिल्हा संघटनेच्या कार्यकारणीची यादी त्यांच्या पत्ता आणि संपर्क क्रमांकासह, खेळाबाबतची माहिती (उदा. खेळसांघिक आहे कीवैयक्तिकखळाडू संख्यावजनगटखेळाची नियमावली), आपली संघटना जिल्हा स्पर्धेचे आयोजन स्वबळावर (तांत्रिक आणि आर्थिक ) करण्यास तयार असल्याचे हमीपत्र सोबत आणावे.

मान्यता मिळालेल्या खेळांमध्ये अष्टे डू आखाडायुनिफाईटकुडोस्पीडबॉलटें सू डोफिल्ड आर्चरीमॉन्टेक्स बॉल क्रिकेटमिनिगोल्फसुपर सेवन क्रिकेटबेल्ट रेसलिंगफ्लोअरबॉलथाबॉक्सिंगहाफ किडोबॉक्सिंगरोप स्कीपिंगसिलंबमवूडबॉलटेनिस व्हॉलीबॉलथांगता मार्शल आर्ट्सकुराशलगोरीरस्सीखेचपॉवरलिफिटींगबीच व्हॉलिबॉलटार्गेट्बॉलटेनिस क्रिकेटजि कुने दोफुटसॉलकॉर्फबॉलटेबल सॉकरहुपकॉन दोनफुटसालकॉर्फबॉलटेबल सॉकरहुपकॉन दोयुग मूग डोवोविनामड्रॉप रो बॉलग्रॅपलिंगपेटाक्युलंगडीजम्परोपस्पोट्स डान्सचॉकबॉलकुडोम्युजिकल चेअरटेनिस बॉल क्रिकेटचायक्वांदोफटबॉल टेनिस आदी खेळांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयलातूर यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी लातूर यांनी केलेले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु