रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात 16 जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात

16 जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूरदि. 11 (जिमाका) : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून येत्या 15 जुलै रोजी लातूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर लातूर आणि रेणापूर शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 16 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात रोजगार देणारे एकूण 11 आस्थापना, उद्योजक यांनी 285 रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. या मेळाव्यात पुणे येथील बीएसए कॉर्पोरेशन एच आर ॲन्ड ॲडमिनने 35 जागा अधिसूचित केल्या असून यासाठी इयत्ता दहावीबारावी, कोणतीही पदवीआयटीआयडिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रात निश्चित करण्यात आली आहे. नांदेड येथील नवकिसान बायो प्लांटेकने सेल्स रिप्रेंझेन्टटिव्हच्या 25 पदे अधिसूचित केली असून यासाठी इयत्ता दहावीबारावी, कोणतीही पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. सोलापूर येथील सनसुर सृष्टी इंडिया प्रा.लि.ने जनरल मॅनेजरब्रांच मॅनेजरअसिटंट मॅनेजरबिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर 35 पदे अधिसूचित केली असून यासाठी इयत्ता दहावीबारावी, कोणतीही पदवीकोणतीही पदव्युत्तर पदवी अशी पात्रता निश्चित केली आहे.

तिरूमला फॅसिलिटी (मदरसन, पुणे) या आस्थापनेत ट्रेनीअप्रेंटिशिपची 35 पदे अधिसूचित करण्यात आली असून यासाठी पात्रता इयत्ता दहावीबारावी कोणतीही पदवी किंवा आयटीआय सर्व ट्रेड अशी आहे. स्पेक्ट्रम फॅसिलिटी (सुझलॉन, जैसलमेर राजस्थान) या आस्थापनेत ट्रेनीची 35 पदे अधिसूचित करण्यात आली असून यासाठी शैक्षणिक पात्रता आयटीआय किंवा डिप्लोमा सर्व ट्रेड राहील. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि.मध्ये रिलेशनशिप ऑफिसरकलेक्शन ऑफिसरची 20 पदे अधिसूचित करण्यात आली असून यासाठी पात्रता बारावी, कोणतीही पदवी अशी आहे. तसेच लातूर एसबीआय लाईफ इंन्शुरंन्स को.लि.मध्ये आर्थिक सल्लागाराची 20 पदे अधिसूचित करण्यात आली असून याची पात्रता इयत्ता बारावी कोणतीही पदवी अशी आहे, तसेच आयएसए (आयसीआयसीआय बँक ॲन्ड ट्रेनिंग पार्टनर) आस्थापनेमध्ये रिलेशनशिप मॅनेजरच्या 30 जागांसाठी पात्रता कोणतीही पदवी राहील.

इएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसेल्स ऑफिसररिस्क कम कॅश ऑफिसरच्या 30 जागांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी कोणतीही पदवीआयटीआय सर्व ट्रेड अशी आहे. लातूर येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. या आस्थापनेत रिलेशनशिप ऑफिसरची 10 पदे अधिसूचित असून यासाठी इयत्ता दहावीबारावी कोणतीही पदवी अशी पात्रता राहील. लातूर येथील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एलआयसी सल्लागारच्या 10 जागांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावीबारावी, कोणतीही पदवी राहील. तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख आस्थापनांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असून या नामांकित आस्थापनाउद्योजक यांनी या कार्यालयाकडे रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. यासाठी दहावीबारावीग्रॅज्युएटपोस्टग्रॅज्युएटआयटीआय. सर्व ट्रेडडिप्लोमा तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

तरी इच्छुक उमेदवारांनी 16 जूलै2024 रोजी सकाळी 10 वाजता रेणापूर शिवाजी महाविद्यालय येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रेस्वत:चा रिझ्युमबायोडाटापासपोर्ट फोटोसह (पाच प्रती) उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 02382- 299462 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावाअसे अवाहन लातूर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु