बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी !

 बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी !

लातूरदि. 08 (जिमाका) : इस्राईलमध्ये नोकरीच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्राईलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावेयासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसीइंटरनॅशनल आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राईलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडून सर्वोतपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी बांधकाम कामगारांनी लातूर जिल्हा क्रीडा संकुलमधील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासमोर जिल्हा कौशल्यरोजगारउद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फ्रेमवर्क तथा शटरिंग कारपेंटरबार बेंडिंग मेसनसिरेमिक टाइलिंग मेसनप्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. निवडलेल्या व्यक्तींना इस्राईलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला 1.4 लाख रूपयांपासून ते 2 लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा 16,000 रूपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल. या पदासाठी 21 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्ती नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. अधिक माहितीसाठी 02382-299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नोंदणीसाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/Users/maharashtra_int_reg?type=1 या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु