‘लातूर हरितोत्सव’मध्ये सहभागी होवूया, पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देवूया !

 ‘लातूर हरितोत्सव’मध्ये सहभागी होवूया,

पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देवूया !

·        14 जुलै रोजी गंजगोलाई परिसरात आयोजन

लातूरदि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीन ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रविवार14 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान  'लातूर हरितोत्सव- 2024या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंजगोलाई परिसरात होणाऱ्या या उपक्रमात एकाच ठिकाणी विविध प्रजातीच्या वृक्षांची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासोबतच वृक्ष लागवडवृक्ष संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमात खासगी रोपवाटिकांचे स्टॉल लावण्यात येणार असून यासाठी 28 अधिक खासगी रोपवाटिकांनी नोंदणी केली आहे. यासोबतच शासकीय रोपवाटिकांचे स्टॉलही याठिकाणी राहणार आहेत.

या उपक्रमामुळे औषधी वनस्पतीशोभेची झाडेपरसबागेमध्ये लावण्यायोग्य झाडेफळझाडे व फुलझाडांची रोपेवृक्षारोपणासाठी आवश्यक सेंद्रिय खतेकुंड्या व इतर आवश्यक साहित्य सवलतीच्या दरात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. लातूर जिल्ह्यात हरित क्षेत्राचे प्रमाण अतिशय कमी असल्याने जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये लोकांचा सहभाग वाढवून ग्रामीण, तसेच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

‘लातूर हरितोत्सव 2024’ या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून लातूरकरांना विविध वृक्षांची माहिती देण्यासोबतच त्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून आपल्या लातूर जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मिलेटस फूड स्टॉलवर चाखायला मिळणार विविध पदार्थांची चव

पौष्टिक तृणधान्य अर्थात मिलेटस हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून जिल्ह्यात मिलेटस लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या खाद्यपदार्थांचे फायदे लोकांना समजावेत आणि मिलेटसपासून बनणाऱ्या पदार्थांची चव चाखता यावी, यासाठी ‘लातूर हरितोत्सव 2024’ उपक्रमात मिलेटसपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचे स्टॉल महिला बचतगटांच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु