घरोघरी जावून भरून घेतले जात आहेत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज उदगीर नगरपालिकेचा अभिनव उपक्रम; १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

 घरोघरी जावून भरून घेतले जात आहेत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज


उदगीर नगरपालिकेचा अभिनव उपक्रम; १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

लातूर, दि. १८ : जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबविले जात आहेत. या योजनेसाठी घरोघरी जावून महिलांचे अर्ज भरून घेण्याचा उपक्रम उदगीर नगरपालिकेने हाती घेतला असून त्यामुळे महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे

राज्य शासनाने २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा ग्राम ते शहर स्तरावर निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पात्र महिलांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारून ते ऑनलाईन नोंदविण्याची कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून करण्यात येत आहे. अंगणवाडी, ग्रामपंचायत, शहरी भागातील विविध केंद्रांमध्ये ऑफलाईन अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्वीकारली जात आहेत.

उदगीर नगरपालिकेने या योजनेसाठी महिलांचे ऑफलाईन अर्ज संकलित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत नगरपालिकेचे १८ कर लिपीक शहरातील विविध भागात जावून महिलांना योजनेची माहिती देत आहेत. तसेच त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेत आहेत. या अर्जांच्या आधारे संबंधित महिलांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी दिली. या योजनेसाठी अर्ज भरण्याची सुविधा निःशुल्क असून यासाठी कोणतीही फी जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु