क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूरदि. 16 (जिमाका) राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणबंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे बुधवार17 जुलै 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 17 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थानकडे प्रयाण करतील. सकाळी 9.15 वाजता शकुंतला निवासस्थान येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. सकाळी 10.15 वाजता उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील ललित भवन मंगल कार्यालय येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त इंजि. विश्वजित अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशनच्यावतीने आयोजित विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता दुधिया हनुमान मंदिर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेतील. सकाळी 11.30 वाजता निडेबन रोडवरील साईधाम सोसायटी येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य किर्तन सोहळा व सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्री समर्थ धोंडूतात्या महाराज मंदिर संस्थान येथे दर्शन घेतील.

ना. बनसोडे हे दुपारी 2 वाजता जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त गोविंद माऊली देवस्थान येथे दर्शन घेतील. सायंकाळी 4 वाजता उदगीर शहरातील महात्मा फुले नगर येथे श्री पप्पू गायकवाड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 4.30 वाजता महात्मा फुले नगर येथे श्री संग्राम अंधारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 4.45 वाजता उदगीर शहरातील गांधी नगर येथे श्री योगेश प्रकाश मेघे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5 वाजता निडेबन येथील पंचशील चौक येथे श्री सुनिल पांढरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5.15 वाजता निडेबन क्रांती नगर येथे श्रीमती सुरेखा चंद्रकांत चिलकलवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5.30 वाजता निडेबन येथे श्री दिगंबर मानसिंग गायकवाड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 6 वाजता उदगीर शहरातील गांधी नगर येथे मोहरम सण कार्यक्रमास उपस्थित राहतील व सोईनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील. लातूर येथील शकुंतला निवासस्थान येथे आमन व राखीव.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु