क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 लातूर, दि. 21 : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे सोमवार, 22 जुलै 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 22 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल व मोटारीने शकुंतला निवासस्थानकडे प्रयाण करतील. सकाळी 10.40 वाजता शकुंतला निवासस्थान येथून मोटारीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता महामहीम राष्ट्रपती यांच्या लातूर जिल्हा दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील.

 ना. बनसोडे हे दुपारी 3.15 वाजता उदगीर तालुक्यातील तोंडचीर येथील श्री करण व्यंकटराव जाधव यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 3.30 वाजता तोंडचीर येथील श्री व्यंकटरेड्डी यचवाड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 4 वाजता उदगीर शहरातील अशोक नगर येथील श्री अशोक मल्लिकार्जुन पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 4.15 वाजता लोहारा गल्ली, चौबारा रोड येथील अॅड. कु. पूनम भरतराव टाकळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 4.30 वाजता पारशेट्टी गल्ली येथील श्री बस्वराज गुळंगे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 4.45 वाजता रेल्वे स्टेशनच्या समोर संत कबीर नगर येथील श्री पवन बाहेती यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5.15 वाजता उदगीर येथील रेल्वे स्टेशन रोडवरील नवीन शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार उदगीर येथून लातूरकडे प्रयाण व लातूर येथील शकुंतला निवासस्थान येथे आगमन होईल.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु