महिला बचतगटांच्या समूह साधन व्यक्ती गाव पातळीवर भरून घेणार मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजनेचे अर्ज * अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया होणार गतिमान

 विशेष वृत्त


महिला बचतगटांच्या समूह साधन व्यक्ती गाव पातळीवर भरून घेणार मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजनेचे अर्ज

* अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया होणार गतिमान

लातूर, दि. १८ ( जिमाका) : प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन मिशन मोडवर काम करीत आहे. या योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी महिला बचतगटांच्या समूह साधन व्यक्ती (सीआरपी) यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे असून याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १९ हजार २८३ महिला बचतगट असून साधारणपणे २० बचतगटांसाठी एक समूह साधन व्यक्ती याप्रमाणे ९७४ इतक्या समूह साधन व्यक्ती कार्यरत आहेत. या सर्व समूह साधन व्यक्तींना 'नारीशक्ती दूत' मोबाईल ॲपद्वारे मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक पात्र लाभार्थी माहिलेच्या अर्ज भरण्याचे ५० रूपये इतके शुल्क शासस्तरावरून समूह साधन व्यक्ती यांना देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील समूह साधन व्यक्ती प्राधान्याने जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १९ हजार २८४ बचतगटातील पात्र महिला सदस्यांच्या ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया संबंधित गावातच पूर्ण करणार आहेत. या बचतगटांसोबत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ८४ हजार कुटुंब जोडली गेलेली आहेत. तसेच इतरही पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची कार्यवाही त्यांच्यामार्फत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होणार आहे. मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी समूह साधन व्यक्ती यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी तालुकानिहाय मार्गदर्शन केले असून ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना केल्या आहेत.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु